उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेकडून ‘मूषक आला रे’ उपक्रमाच्या माध्यमातून भाविकांच्या मनोकामना मुंबईचा राजाच्या चरणी पोहोचवण्याचा अनोखा प्रयत्न
POSTED BY : MRUNALI SAKPAL DT. 26/10/2026 📞 8850212023
मुंबई NHI24.COM : : यंदाच्या गणेशोत्सवात उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक ‘मूषक आला रे’ उपक्रमाच्या माध्यमातून बाप्पाला भाविकांच्या अधिक जवळ घेऊन येत आहे. गणपती बाप्पाचा लाडका मूषक भाविकांच्या मनातील इच्छा बाप्पापर्यंत पोहोचवतो, या श्रद्धेवर आधारित हा उपक्रम आखण्यात आला आहे.
हा उपक्रम गणेशोत्सवाचा आनंद अधिक सुलभ आणि सर्वसमावेशक बनवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला आहे, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि शारीरिक अडचणींमुळे गर्दीच्या मंडपांना भेट देणे कठीण जाणाऱ्या व्यक्तींसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून, फिरत्या कॅन्टर व्हॅनवर विराजमान केलेली मूषकराज यांची भव्य प्रतिकृती पुढील सहा दिवसांत मुंबई आणि पुण्यात प्रवास करेल, ज्यामध्ये वृद्धाश्रम, ज्येष्ठ नागरिक केंद्रे, गृहनिर्माण संस्था आणि इतर सामाजिक वसाहतींना भेट दिली जाईल.
प्रत्येक ठिकाणी भाविकांना या मूषकाच्या कानात आपल्या मनोकामना सांगण्याची संधी मिळेल, ज्यामुळे बाप्पाच्या लाडक्या दूतामार्फत आपल्या इच्छा बाप्पापर्यंत पोहोचवण्याची श्रद्धा जपली जाईल.
हा अनुभव अधिक अविस्मरणीय बनवण्यासाठी भाविकांना मुंबईचा राजाचे व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर)द्वारे प्रत्यक्ष दर्शन घडवले जाईल, ज्यामुळे त्यांना डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मंडपातील भव्यता आणि वातावरणाचा हुबेहूब अनुभव घेता येईल. स्वतः प्रत्यक्ष जाऊ न शकणाऱ्या भाविकांना मंडपात उपस्थित असल्याचा अनुभव मिळवून देणे आणि बाप्पाचे दर्शन त्यांच्या दारी पोहोचवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या अनुभवाची सांगता भाविकांना मुंबईचा राजाच्या प्रसादाच्या रूपातील आशीर्वादाने होईल, ज्यामुळे श्रद्धा, परंपरा आणि तंत्रज्ञानाचा संगम साधत सहभागींना अर्थपूर्ण आणि अविस्मरणीय उत्सवाचा अनुभव मिळेल.
‘मूषक आला रे’च्या माध्यमातून, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक श्रद्धा, परंपरा आणि तंत्रज्ञानाची सांगड घालून गणेशोत्सव अधिक सुलभ आणि सर्वसमावेशक बनवण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे वय किंवा शारीरिक मर्यादा उत्सवाचा उत्साह आणि आनंद अनुभवण्यात अडथळा ठरणार नाहीत.
या प्रसंगी मत व्यक्त करत उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे सीएमओ लक्ष्मण वेलायुथम म्हणाले, “सण-उत्सवांमध्ये लोकांना एकत्र आणण्याची अनोखी ताकद असते आणि गणेशोत्सवाचा मूळ गाभा या एकतेच्या भावनेमध्ये रुजलेला आहे. ‘मूषक आला रे’च्या माध्यमातून, उत्सवाचा भाग होण्याकरिता वय किंवा शारीरिक मर्यादा आड येऊ नयेत, याची खात्री करण्यासाठी साधे, पण अर्थपूर्ण पाऊल उचलण्याचे आमचे उद्दिष्ट होते. बाप्पाच्या मूषकाला प्रत्यक्ष लोकांच्या भेटीस आणून, आम्हाला जे स्वतः मंडपात जाऊ शकत नाहीत अशा भाविकांसाठी आनंद, आत्मीयता आणि सर्वसमावेशकतेचा क्षण निर्माण करण्याची आशा आहे.”
भाविकांच्या इच्छा पूर्ण करण्याचे आश्वासन देण्याऐवजी उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने स्वतःला साहाय्यक (सुविधा पुरवणारे माध्यम) म्हणून सादर केले, जेथे बँकेने हा सणासुदीचा आनंद अनुभवण्यापासून वंचित राहू शकणाऱ्या भाविकांमधील शारीरिक अडथळे दूर करण्यास मदत केली.
‘मूषक आला रे’च्या माध्यमातून, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचा डिजिटल मोहीम अर्थपूर्ण प्रत्यक्ष अनुभवात रूपांतरित केली जाऊ शकते हे दर्शवण्याचा प्रयत्न होता, ज्यामुळे सांस्कृतिक उत्सव अधिक सुलभ बनवता आले आणि केवळ प्रत्यक्ष भेटी मिळालेल्या घटकांपुरते मर्यादित न राहता सर्वदूर पोहोचू शकणारी आदर्श यशोगाथा निर्माण करता आली.
About Ujjivan Small Finance Bank Limited:
Ujjivan Small Finance Bank Limited is a Scheduled Commercial Bank serving ~1 Cr+ customers through 814 branches across 347 districts in 26 states and Union Territories, supported by robust digital channels. The Bank offers a diversified portfolio spanning across Affordable Housing, MSME, Agri, Vehicle, Gold, Micro-Mortgage, FIG, and Microfinance (group and individual) loans. As of Jun 30, 2026, Ujjivan’s gross loan book stood at ₹42,903 Cr, with deposits of ₹48,129 Cr and a Net worth of ₹7,144 Cr. The Bank is rated AA- (Stable) for long-term facilities and A1+ for short-term instruments by CARE Ratings and CRISIL, respectively, reflecting the sustained strength of the banks performance and balance sheet.




