BANKINGUncategorized

यशस्वीचा शतकी तडाखा, रोहित-विराटचं अर्धशतक, भारताने सामन्यासह मालिका जिंकली, दक्षिण आफ्रिकेचा हिशोब

रोहित-विराटचं अर्धशतक, भारताने सामन्यासह मालिका जिंकली

यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा आणि विराट कोहली या त्रिकुटाने केलेल्या चाबूक खेळीच्या जोरावर भारताने एकतर्फी विजय मिळवला. भारताने अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेला 2-1 ने लोळवलं.

IND vs SA : यशस्वीचा शतकी तडाखा, रोहित-विराटचं चाबूक अर्धशतक, भारताने सामन्यासह मालिका जिंकली, दक्षिण आफ्रिकेचा हिशोब
Yashasvi Jaiswal Maiden Odi HundredImage Credit source: Bcci x Account
MUMBAI : यशस्वी जैस्वाल याचं शतक आणि रोहित शर्मा तसेच विराट कोहली या अनुभवी जोडीने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या-अंतिम एकदिवसीय सामन्यात 9 विकेट्सने दणदणीत आणि एकतर्फी विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 271 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने हे आव्हान 61 बॉलआधी 1 विकेट गमावून पूर्ण केलं. टीम इंडियाने 39.5 ओव्हरमध्ये विजयी आव्हान पूर्ण केलं. भारताने अशाप्रकारे हा सामना जिंकला. भारताने यासह ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. टीम इंडियाने मालिकेत विजयी सलामी दिली होती. भारताने रांचीत विजयी सुरुवात केली. तर रायपूरमध्ये दक्षिण आफ्रिकेने कमबॅक करत मालिकेत बरोबरी साधली. त्यामुळे तिसरा सामना हा निर्णायक असा होता. मात्र भारताने दक्षिण आफ्रिकेला लोळवत कसोटी मालिकेतील पराभवाची परतफेड केली.

रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल या सलामी जोडीने भारताच्या विजयाची स्क्रीप्ट लिहीली. यादोघांनी दीडशतकी भागीदारी करत भारताचा विजय निश्चित केला. दोघांनी संयमी सुरुवात केली. दोघांनी ठराविक धावांनंतर गिअर बदलला. रोहितने या भागीदारी दरम्यान अर्धशतक झळकावलं. रोहितला शतक करण्याची संधी होती. मात्र रोहित फटकेबाजी करताना आऊट झाला. रोहितने 75 रन्स केल्या. रोहित आऊट होताच धावांची सलामी जोडी फुटली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 155 धावांची भागीदारी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!