BANKINGUncategorized
यशस्वीचा शतकी तडाखा, रोहित-विराटचं अर्धशतक, भारताने सामन्यासह मालिका जिंकली, दक्षिण आफ्रिकेचा हिशोब
रोहित-विराटचं अर्धशतक, भारताने सामन्यासह मालिका जिंकली
यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा आणि विराट कोहली या त्रिकुटाने केलेल्या चाबूक खेळीच्या जोरावर भारताने एकतर्फी विजय मिळवला. भारताने अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेला 2-1 ने लोळवलं.

Yashasvi Jaiswal Maiden Odi HundredImage Credit source: Bcci x Account
टीम इंडिया ‘यशस्वी’
रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल या सलामी जोडीने भारताच्या विजयाची स्क्रीप्ट लिहीली. यादोघांनी दीडशतकी भागीदारी करत भारताचा विजय निश्चित केला. दोघांनी संयमी सुरुवात केली. दोघांनी ठराविक धावांनंतर गिअर बदलला. रोहितने या भागीदारी दरम्यान अर्धशतक झळकावलं. रोहितला शतक करण्याची संधी होती. मात्र रोहित फटकेबाजी करताना आऊट झाला. रोहितने 75 रन्स केल्या. रोहित आऊट होताच धावांची सलामी जोडी फुटली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 155 धावांची भागीदारी केली.




